इयत्ता 5 वी ते 12 वी च्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी माहिती SDMIS Portal मध्ये दिलेल्या मुद्यांनुसार Online माहिती भरावी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग व तुकडी निवडावी व माहीती अपडेट करावी.शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या द्रुष्टीने माहीती अचूक भरावी.अधिक माहितीसाठी www.student.udise.in

10 वी मार्च 2024 निकाल प्रसिद्धी

10 वी निकाल 2024                                 


10 वी निकाल 2024 |10 th exam result | 10 exam result 2024
10 वी निकाल

 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल

प्रकटन

मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या
 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) 
परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित
 कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
 त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य 
माध्यमिक व उच्व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,
 कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण
 या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये
 घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 
(इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या 
कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, 
दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता
 ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
खालील लिंकला टच करून आपला निकाल पाहावा.
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahresult.nic.in
3. http://sscresult.mkcl.org
4. https://sscresult.mahahsscboard.in
5. https://results.targetpublications.org
6. https://www.tv9marathi.com
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) 
मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व
 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण 
उपरोक्तसंकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व
 सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत
 निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती 
उपलब्ध होईल.
तसेच https://mahahsscboard.in या 
संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल 
उपलब्ध होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
 (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या
 अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) 
  कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या
 गुणांची गुणपडताळणी  व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, 
पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे
  ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन 
(http://verification.mh-ssc.ac.in)
  स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून
 देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना
 संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत, गुणपडताळणी व
 छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८/०५/२०२४ से मंगळवार, 
 दिनांक ११/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
 त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/
  UPI/ Net Bankingयाद्वारे भरता येईल. 
२) मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी 
ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन 
करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून 
छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच
दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून
विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे
 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. 
ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी
अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे  संपर्क साधावा.
३) मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस
 सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या
 दोनच संघी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार
   (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त
 प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी
 परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक
 ३१/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने
 आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे 
निर्गमित करण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


वार्षिक नियोजन 2023-24

इयत्ता 5वी      मराठी   येथे क्लिक करा.
                     हिंदी     येथे क्लिक करा.

क्लॉक

 https://www.timeanddate.com/worldclock/india/pune

इयत्ता 10 वी प्रश्नपेढी 20-21

 

            इयत्ता १० वी प्रश्नपेढी

नोट : इतर विषयांच्या प्रश्नपेढी संकेतस्थळावर लवकरच अपलोड होत आहेत.

माध्यम : मराठी

अनु. क्र.विषयडाउनलोड
1.गणित : भाग - १Download Download
2.गणित : भाग - 2Download Download
3.इतिहास आणि राज्यशास्त्रDownload Download
4.भूगोलDownload Download
5.कुमारभारतीDownload Download
6.English (17) Third LanguageDownload Download
7.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - १Download Download
8.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - २Download Download

Medium : English

Sr.No.SubjectDownload
1.History and Political ScienceDownload Download
2.GeographyDownload Download
3.English (03) First LanguageDownload Download
4.AksharbharatiDownload Download
5.Mathematics Part IDownload Download
6.Mathematics Part IIDownload Download
7.Mathematics Part II
(Updated with Coordinate Geometry)
Download Download
8.Science & Technology Part 1Download Download
9.Science & Technology Part 2Download Download
सौजन्य - राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य

क्रांति सूर्य ज्योतिबाफुले


सामाजिक क्रांतिचे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या १९४ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.!

      जोतीराव फुले यांचे मूळ गांव सातारा जिल्ह्यातल खटाव- माण कटगुण होय. या गावातील कुलकर्णी ब्राह्मणाने जोतीरावांच्या पूर्वजांची सर्व शेतजमीन कपटाने हडप केली. यास्तव जोतीरावांचे पुर्वजांनी (पणजोबा) कुलकर्णी ब्राह्मणाला ठार केले आणि कटगुण गाव सोडून पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे काही काळ वास्तव्य केले. जोतिराव फुले यांचे मूळ आडनांव गो-हे होते.

       जोतिराव यांचे आजोबा शेटीबा यांना तीन मुले होती.(१) राणोजी, (२) कृष्णाजी आणि (३) गोविंदराव.

       गोविंदराव यांना दोन मुले होती. (१) राजाराम (२) जोतिराव.

     जोतिराव यांचे आजोबा शेटीबा पुणे येथे येऊन फुलांचा व्यवसाय करु लागले यास्तव त्यांचे 'गो-हे' हे आडनांव मागे पडून "फुले" आडनांव झाले.

       दि. ११ एप्रिल १८२७ रोजी चिमणामाई यांच्या पोटी जोतिराव यांचा जन्म झाला.

      जोतिराव यांच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत दि. २५ डिसेंबर १८२७ रोजी आई चिमणामाईंचे निधन झाले. यानंतर जोतिरावांचे पालनपोषण त्यांची मावसबहिण सगुणाताई क्षीरसागर यांनी केले.गोविंदराव यांनी सन १८३३ मध्ये 'चर्च ऑफ स्काॅटलॅंड मिशन' या शाळेत जोतीरावांचे नांव दाखल केले. गोविंदरावांच्या फुलांच्या दुकानातील कारकून कृष्णाजी देव याने कारस्थान रचून गोविंदरावांना वैदिक-ब्राह्मणी वर्णधर्माच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) कारस्थानाद्वारे फूस लावून जोतिरावांना शाळेतून काढायला लावले. परिणाम यानंतर जोतिराव शेतात काम करु लागले. पुढे सन १८४० मध्ये नायगांवचे खंडोजी सिंदूजी पाटील यांची मुलगी सावित्रीमाई यांच्याशी जोतिरावांचा विवाह झाला.

     जोतिरावांच्या बागेशेजारी राहात असलेले गफारबेग मुन्शी आणि त्यांचे मित्र मिस्टर लिजिट साहेब यांनी जोतिरावांच्या शिक्षणांची आवड पाहिली आणि गोविंदराव यांना शिक्षणांचे महत्त्व सांगून जोतिरावांना १८४१ मध्ये स्काॅटिश मिशनरी शाळेत घातले. याच शाळेत जोतिरावांनी इंग्रजी माध्यमाच्या सातवी पर्यंतचे शिक्षण सफलतेने पूर्ण केले.  यानंतर अमेरिकन विचारवंत थाॅमस पेन यांनी लिहिलेले "मानवाचे हक्क" (Rights of man) हे पुस्तक वाचले. या पुस्तकाचा जोतिरावांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला.

     जोतिराव यांचे व्यायाम शाळेचे शिक्षक लहूजी रंगराऊत हे वर्ण धर्मानुसार अतिशूद्र मातंग होते.

     वस्ताद लहूजी यांनी जोतिरावांना सन १८४७ पर्यंत दांडपट्टा, ढाल- तलवार, नेमबाजी, कसरती, भालाफेक यांचे शिक्षण दिले.

         महात्मा जोतिरावांनी इंग्रजी माध्यमातून सातव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण घेतले असल्याने त्यांना इंग्रजांकडे मोठ्या पदांवर नोकरी मिळणे सहज शक्य होते परंतु त्यांनी नोकरी न करता सामाजिक व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यासाठी आपले तन-मन-धन आणि स्वतःला झोकून दिले.

      जोतिराव फुले हे ब्राह्मणी वर्ण धर्मानुसार शूद्र वर्णाच्या माळी जातितील असल्याने त्यांचा ब्राह्मण मित्र सखाराम परांजपेच्या लग्नाच्या वरातीतून वडीलधाऱ्या नातेवाईकांनी जोतिरावांना अपमानीत करुन हाकलून दिले.  या झालेल्या अपमानाचा जोतिरावांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला.

       जोतिराव फुले यांनी दुःख न करता त्यांच्या अपमानाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा केली. या अपमानाचे कारण या देशातील सामाजिक व्यवस्था असून, ब्राह्मण निर्मित वैदिक-ब्राह्मणी-वर्णधर्म आणि या धर्मातील अनेक धार्मिक विधी आणि साहित्य कारणीभूत असल्याचे त्यांनी निदान केले,  तसेच यावरील उपाय योजनेच्या कार्याबाबतचे सखोल चिंतन- मनन जोतिराव फुले यांनी केले. यानंतर जोतिराव फुले यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी दोन भागात सामाजिक व्यवस्थेची परिवर्तनीय मांडणी करून ब्राह्मणेतरांच्या दुःखाचे, दारिद्र्याचे आणि मानसिक गुलामगिरीचे कारण अविद्या (अज्ञान) असल्याचे मूलभूत सत्यशोधन केले. यास्तव "जोतीराव फुले हेच आधुनिक भारताचे सत्यशोधक ठरतात.!" यावर आपल्या गुलामगिरी पुस्तकातील अखंडात जोतिराव फुले म्हणतात,

"विद्येविना मती गेली! मतिविना निती गेली!

नितिविना गती गेली! गतिविना वित्त गेले!

वित्ताविना शुद्र खचले! इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.!"

        भारतीय समाजातील तमाम शूद्र (OBC- NT- DNT- VJNT- SBC- MBC) अतिशुद्रांच्या (SC- ST) मानसिक गुलामगिरीचे खरे कारण शोधले आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी भारतातील पहिली मुलींची शाळा दि. ०१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात काढली.

      शूद्र- अतिशूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. यावर जोतिराव फुले म्हणतात, "आणिक भटांनी कपटे केली, विद्या ती ठेवली आपले हाती.!"

इ. स. १८७६ ते १८८२ या काळात जोतिराव फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद (नगरसेवक) होते.

इंग्रज सरकारने शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी विद्या खात्यामार्फत दि.१६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या हस्ते ज्योतिराव फुले यांना दोन शाली आणि रुपये १९३.०० देऊन सन्मानित करण्यात आले. या विश्रामबागवाडा, पुणे येथे पार पडलेल्या समारंभाला खूप लोक उपस्थित होते.

जोतिराव फुले यांनी आरंभलेले बहुजन उद्धारासाठीचे शैक्षणिक कार्य, सामाजिक जागृतीचे काम पाहून पुण्यातील ब्राह्मण फारच चिडले होते. संतप्त भटा-बामणांनी रोडे आणि धोंडीराम नामदेव कुंभार यांना हत्या करण्यासाठी प्रत्येकी एक हजाराची सुपारी देऊन पाठविले होते. परंतु जोतीरावांनी या दोन भूमिपुत्र बांधवांना आपण करीत असलेल्या सर्वंकष सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. हे सर्व ऐकून या दोन्ही मारेकऱ्यांचे ह्रदयपरिवर्तन झाले. या दोघांनी जोतीराव फुले यांची क्षमा मागितली. या सर्व घटनेवरून जोतिराव फुले यांचे सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचे कार्य किती महान होते.? याची जाणीव होते.

       सन १८५७ च्या बंडाला ब्राह्मण इतिहासकार "भारताच्या स्वातंत्र्याचे आंदोलन" म्हणतात. परंतु वेगळा दृष्टिकोण असणारे इतिहासकार जोतिराव फुले या आंदोलनाला 'भट पांड्याचे आंदोलन' म्हणतात. पुढे जोतिराव लिहितात, "त्या लोकांचे (इंग्रजाचे) राज्य या देशात आहे, तोच आपण शूद्रांनी जलदी करुन भटांच्या वडीलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे.!  बहुपत्नीत्व आणि लहान मुलींचे म्हाता-यांशी लग्न लावून देण्याची कुप्रथा असल्याने विधवा महिलांची संख्या वाढत चालली होती म्हणून जोतिरावांनी विधवांच्या पुनर्विवाहास मदत केली तसेच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. यामुळे अनेक ब्राह्मण विधवा महिलांनी जोतिराव फुले यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात येऊन बाळंतपण आटोपून ब्राह्मण कुटुंबाची इज्जत वाचविली.

       छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जोतिराव फुले रायगडावर गेले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी त्यांना ३ दिवस अवधी लागला होता. जोतिरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील जंगली झाडे झुडपे तोडून समाधी स्वच्छ धुवून समाधीवर फुले वाहिली. हि बातमी रायगडाच्या पायथ्याशी राहणा-या ग्रामजोशीला कळाली. यावर तो तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ येऊन म्हणाला, 'अरे कुणबट शिवाजीचा देव केला. मी ग्रामजोशी असता मला दक्षिणा, शिधा देण्याचे राहिले बाजूला, केवढा हा अपमान." आणि ग्रामजोशाने समाधीवर वाहिलेली फुले लाथेने उधळून लावली.  यानंतर ग्रामजोशी म्हणाला, "अरे कुणबटा, तुझा शिवाजी काय देव होता, म्हणून त्याची पूजा केलीस तो शुद्रांचा राजा होता त्याची मुंज देखील झाली नव्हती." या घटनेने जोतीराव अत्यंत संतापले. पुढे जोतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिली काव्य निर्मिती- पोवाडा लिहिला. इतकेच नव्हे तर जोतिरावांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी उभारलेले स्वराज्य प्रेरणास्त्रोत आहे यास्तव जयंती सोहळा- शिवजन्मोत्सव सुरू केला.  त्याचवेळी जोतिराव फुले यांनी इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जीवनावरही पोवाडा लिहिला आहे.

        जोतिराव फुलेंनी दि.२४ सप्टेंबर, १८७३ रोजी पुणे येथे बैठक घेऊन सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या बैठकीत पुणे, मुंबई आणि इतर अनेक भागातील जवळपास ६० सत्यशोधक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. सत्यशोधक समाज स्थापनेचा उद्देश- शूद्र-अतिशूद्रांना ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या थोतांडापासून जागे करणे आणि ब्राह्मणी गुलामगिरीतून त्यांची मुक्तता करणे हा होता.

         जोतिराव यांच्या ६०व्या वर्षी त्यांच्या तमाम चाहत्यांनी दि. ११ मे १८८८ रोजी मुंबईत मांडवी कोळीवाडा सभागृहात हजारो लोकांच्या उपस्थितीत महात्मा हि पदवी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय सभा म्हणजेच कांग्रेस हि भटाबामणांची आहे, असे महात्मा फुले यांचे स्पष्ट मत होते. डिसेंबर १८८९ मध्ये कांग्रेसची सभा मुंबईला झाली तेव्हा जोतीराव फुले यांनी गवताने बनविलेला ३० फुटी शेतकऱ्यांचा उंच पुतळा कांग्रेसच्या मंडपासमोर ठेवून कष्टकरी शेतकरी बांधवाची स्थिती कांग्रेसला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

         जोतिराव फुले यांच्या दैनंदिनी बाबतच्या महत्त्वपूर्ण नोंदी म्हणजे ते पहाटे ४ वाजता उठत असत. सकाळी ५ वाजता फिरायला जात असत. दुपारचे जेवण १२ वाजता आणि रात्रीचे जेवण ७ वाजता करीत असत आणि रात्री १० वाजता झोपत असत.

        दि.२७ नोव्हेंबर १८९० रोजी जोतिराव हे आजारी असताना देखील मुंबईचे रामस्वामी अय्यावरु, रावसाहेब नारायण मेघाजी लोखंडे, पुण्यातील डॉ.विश्राम रामजी घोले यांची भेट घेतली आणि.. "आता हे अपूर्ण कार्य पूर्ण करा.!" असा संदेश दिला.

        क्रांतिसूर्य, सत्यशोधक- राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन.


            धन्यवाद..!


           

संविधान कृतीपत्रिका

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

                       भारताचे संविधान 

संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका 

आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीतप्रतिज्ञावंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो. या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले, कोणी तयार केलेसंविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत. 

२६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या .

कृती. १ : 

राष्ट्रगीतप्रतिज्ञावंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा.

कृती २ : 

भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्राला शेअर करा आणि त्याच्या बरोबर  त्या फिल्ममधील  काय आवडले, काय समजले या बद्दल मित्राशी  व्हॉट्स ऍप, सेंजर वर गप्पा मारा आणि 

संवाद शिक्षकांना शेअर करा. 

India : The Spirit of Freedom

 कृती ३ : 

भारताच्या संविधानाची  मराठीइंग्रजी व हिंदी भाषेतील उद्देशिका सोबत दिली आहे. त्याचे वाचन करून खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. ( पहिल्या तीन ओळीत नमुना शब्द दिले आहेत. त्याला समांतर शब्द शोधायचे आहेत. शेवटच्या तीन ओळींसाठी शब्द निवडायचे आहेत )




            

मराठी

हिंदी

इंग्रजी

लोकशाही

लोकतंत्रात्मक

Democratic

सार्वभौम

 

 

 

स्वतंत्रता

 

 

 

Equality

 

 

 

 

 

 

 

 

 

कृती ४ : खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

  1.  खाली दिलेल्या रकान्यांमध्ये स्वातंत्र्य या शब्दाशी निगडीत असणारे शब्द भरून 

                               तक्ता पूर्ण  करा

    
          
   2. खालील चित्र भारताच्या संविधानाच्या कोणत्या 
       मूल्याशी निगडीत आहे? या मूल्याबद्दल                     उद्देशिकेमध्ये काय म्हटले आहे?

                              
 
3. ही उद्देशिका कोणी कोणाला अर्पित केली आहे?      4.  उद्देशिकेमधील व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता' या दोन घटकांचा कोणत्याही एका         मूल्यासंदर्भात अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.  

कृती ५

     राज्यसभेच्या यु-ट्यूब चॅनेलवर २०१४ साली राज्यसभेच्या दूरदर्शन  चॅनेलवर प्रसारित झालेल्या दहा भागांची धारावाही उपलब्ध आहे.  नागरिक शास्त्रातील अनेक संकल्पना, भारतीय घटनेतील अनेक तरतुदी कशा निश्चित केल्या हे दाखवण्यासाठी हे भाग उपयोगी आहेत. संविधान : मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टीट्युशन या मालिकेचे दिग्दर्शन शाम बेनेगल यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही मालिका उपलब्ध आहे. त्यातील दहावा भाग बघताना खालील मुद्यांच्या आधारे नोंदी करा. -  

संविधान : भाग 10

  1. उद्देशिकेवरील चर्चेत कोणत्या ऐतिहासिक नेत्यांनी सहभाग घेतला?
  2. उद्देशिकेमध्ये कोणकोणते बदल सुचवण्यात आले?
  3. उद्देशिकेमधील कोणकोणत्या शब्दांवर चर्चा झालीका?
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचे सार तुमच्या शब्दात लिहा.

भाग

शीर्षक

1

The First Step: Cabinet Mission To Objectives Resolution

2

Independence: A Divided Legacy

3

Independent India: Righting Fundamental Wrongs with Fundamental Rights 

4

People's Rights, Principles of Governance and Duties

5

Strengthening The Weak: Minority, Women and Backward Rights

6

Whose Land Is It?: Land Reforms And Acquisition

7

Link Language: Hindi Or Hindustani?

8

Federalism: Linking The States And The Centre

9

Three Pillars: Executive, Legislature, Judiciary

10

From Preamble to the Final Draft and beyond



शिक्षकांसाठी : आठवीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व नागरिकशास्त्र आहे आणि दहावीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व राज्यशास्त्र असे का आहे?  

                 प्रशांत दिवेकर 

            ज्ञान प्रबोधिनी, पुणे 


दैनंदिन निरीक्षण नोंदी - सर्व विषय

मूल्यमापन - नोंदी : ( वर्णनात्मक )

नमस्कार, 
  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन धोरणा अंतर्गत मुलांच्या सर्व विषयाच्या करावयाच्या वर्णनात्मक नोंदी नमुना इथे उपलब्द करून दिला आहे.

दैनंदिन निरीक्षण नोंदी - सर्व विषय

मराठी भाषा विषय नोंदी 
1आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
2ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
3बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
5प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
6मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
9लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
10योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
11विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
12स्वत:हून प्रश्न विचारतो
13कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
15नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
16दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
19व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
20भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
22ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
23मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
24निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
26अवांतर वाचन करतो
27गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
28मुद्देसूद लेखन करतो
29शुद्धलेखन अचूक करतो
30अचूक अनुलेखन करतो
31स्वाध्याय अचूक सोडवितो
32स्वयंअध्ययन करतो
33अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34संग्रहवृत्ती जोपासतो
35नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
36भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
37लेखनाचे नियम पाळतो
38लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
39वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
40दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
41पाठातील शंका विचारतो
42हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
43गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
44वाचनाची आवड आहे
45कविता चालीमध्ये म्हणतो
46अवांतर वाचन ,पाठांतर करतो
47सुविचाराचा संग्रह करतो
48प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
49दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50बोधकथा सांगतो
51वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 
इंग्रजी विषय नोंदी
1Solves the Activity by confience 
2Copies the Letters and words correctly
3Reads aloud from textbook 
4Writes correctly on one line 
5Listens with concentration 
6Reads the poem in rhythm
7Reads and act accordingly 
8Reads the part in dialougs by understanding 
9Writes the answer of questions 
10Takes part in language game 
11Reads silently by understanding 
12Recites with enjoyment poems and songs 
13Gives responses in various contexts
14identifies commonly used words 
15Rearranges the story events 
16Enjoys the rhythm and understand 
17Takes the dictation of familiar words 
18Reads english daily newspaper 
हिंदी विषय नोंदी 
1सामान्य सूचनाओ को समझता है
2स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है
3वर्णोका योग्य उच्चारण करता है
4चिंत्रो को देखकर शब्द कहता है
5रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है
6सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है
7स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है
8पाठयांश का आशय समझता है
9गीत और कविताए कंठस्थ करता है
10मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है 
11अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है
12मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है
13हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है
14मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है
15पाठयांश को समझतापूर्वक पढता है
16मौनवाचन समझतापूर्वक करता है
17हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
18लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
19नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता है
20पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है
21समाचारपत्र दररोज पढता है
22सुसष्ट और शुद्ध लेखन करता है
23दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है
24परिचित विषयपर निबंध लेखन करता है
25दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है
26हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता है
27हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है
28हिंदी में कहानी सुनाता है
29अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है 
30शुद्धलेखन समझतापूर्वक करता है
गणित विषय नोंदी 
1संख्या वाचन करतो
2लहान मोठ्या संख्या ओळखतो
3संख्याचा क्रम ओळखतो
4संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
5बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
6पाढे पाठांतर करतो
7गुणाकाराने पाढे तयार करतो
8संख्या अक्षरी लिहितो
9अक्षरी संख्या अंकात मांडतो
10संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
11संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
12तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
13संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
14विविध भौमितिक संबोध समजून घेतो
15विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
17गणितीय चिन्हे ओळखतो
18चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
19गणितातील सूत्रे समजून घेतो
20सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो
21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
23विविध परिमाणे समजून घेतो
24परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
25विविध राशिची एकके सांगतो
26विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
27उदाहरणे गतीने सोडवितो
28सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
29आलेखाचे वाचन करतो
30आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
31दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
32विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
33संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
34संख्या विस्तारीत रूपात लिहितो
35समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
36अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
37क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
38थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
39उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
40दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
41गणितीय कोडी सोडवितो
42सारणी व तक्ता तयार करतो 
विज्ञान विषय नोंदी 
1विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
2विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
3आधुनिक शोधाची माहिती घेतो
4आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
5वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
6विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
7वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
8विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
9चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
10धातू व अधातू सांगतो
11नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
12भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
13मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
14जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
15सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
16मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
17प्रथमोपचाराची माहिती सांगतो
18परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो
19अवकाशीय घटना समजून घेतो
20वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
21वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
22प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
23प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
24प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
25धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
26पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
27बदलाचे प्रकार सांगतो
28बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
29पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
30नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
31समतोल आहाराचे महत्व सांगतो
32रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
33रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
34प्रदूषणाचे प्रकार सांगतो
35प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
36प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
37वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
38पाण्याचे महत्व जाणतो
39पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
40नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
41वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
42पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो
43अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
44विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
45टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
46वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो 
परीसर अभ्यास - विषय नोंदी 
1विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
2विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
3आधुनिक शोधाची माहिती घेतो
4आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
5वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
6विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
7वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
8विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
9चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
10धातू व अधातू सांगतो
11नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
12भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
13मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
14जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
15सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
16मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
17प्रथमोपचाराची माहिती सांगतो
18परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो
19अवकाशीय घटना समजून घेतो
20वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
21वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
22प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
23प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
24प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
25धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
26पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
27बदलाचे प्रकार सांगतो
28बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
29पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
30नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
31समतोल आहाराचे महत्व सांगतो
32रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
33रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
34प्रदूषणाचे प्रकार सांगतो
35प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
36प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
37वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
38पाण्याचे महत्व जाणतो
39पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
40नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
41वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
42पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो
43अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
44विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
45टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
46वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो
47ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
48संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
49समाजसुधारकाची माहिती सांगतो
50संविधानाचे महत्व सांगतो
51थोर नेत्याची माहिती सांगतो
52ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
53नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो
54प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो
55नकाशे काढतो व भरतो
56नकाशा वाचन करतो
57नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो
58नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो
59पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो
60लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो
61लोकसंख्या जनजागृती करतो
62क्षेत्रभेटीत सहभागी होतो
63सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो
64वृक्षारोपण व संवर्धन करतो
65राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो
66नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
67पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो
68पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो
69ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो
इतिहास विषय नोंदी
1ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
2सुचवलेल्या घटना अचूक आणि स्‍पष्‍ट शब्‍दात सांगतो
3घटना अगदी जशीच्या तशी सांगतो
4प्रशन लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो
5भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो
6विविध  भौगोलिक जीवनाची माहिती देतो
7सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो
8नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो
9नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो
10स्‍वाध्‍यायाची  परीणामकारक उत्‍तरे  देतो
11जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो
12ऐतिहासिेक वस्‍तूंचा संग्रह करतो
13प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो
14प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो
15संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
16समाजसुधारकाची माहिती सांगतो
17संविधानाचे महत्व सांगतो
18थोर नेत्याची माहिती सांगतो
19ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
20नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो 
भूगोल विषय नोंदी
1प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो
2नकाशे काढतो व भरतो
3नकाशा वाचन करतो
4नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो
5नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो
6पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो
7लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो
8लोकसंख्या जनजागृती करतो
9क्षेत्रभेटीत सहभागी होतो
10सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो
11वृक्षारोपण व संवर्धन करतो
12राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो
13नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
14पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो
15पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो
16ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो 
कला विषय नोंदी
1कलेचे विविध प्रकार समजून घेतो
2मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो 
3चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
4चित्रे सुंदर काढतो
5प्रमाणबद्ध रेखाटन करतो
6मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
7रंगाच्या छटातील फरक ओळखतो
8चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
9चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
10कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
11विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
12कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
13वर्ग सजावट करतो
14मातीपासून विविध आकार बनवितो
कार्यानुभव विषय नोंदी 
1कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो
2कृती,उपक्रम आवडीने करतो
3उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो
4तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
5परिसर स्वच्छ ठेवतो
6नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो
7कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो
8आधुनिक साधनाचा वापर करतो
9व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
10चर्चेत सहभागी होतो
11समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो
12विविध मुल्याची जोपासना करतो
13साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो
14शिक्षकाचे सहकार्य घेतो
15आत्मविश्वासाने कृती करतो
16समजशील वर्तन करतो
17ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो
18समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
19दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो
20प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो
21प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो 
शारीरिक शिक्षण विषय नोंदी
1खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
2आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
3तालबद्ध  हालचाली करतो
4गटाचे नेतृत्व करतो
5खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
6गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो
7इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
8विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
9खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
10मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
11क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
12आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
13मनोरंजक खेळात सहभागी होतो
14शारीरिक श्रम आनंदाने करतो
15मैदानाची स्वच्छता करतो
16जय पराजय आनंदाने स्वीकारतो
17पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
18खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
19श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
20शिस्तीचे पालन करतो
21विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
22विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
23विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
24कलेविषयी रुचि ठेवतो
25दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
26आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो
इतर नोंदी
विशेष प्रगती
1शालेय शिस्त आत्मसात करतो
2दररोज शाळेत उपस्थित राहतो
3वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
6वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7कविता पाठांतर करतो, सुरात गातो
8इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9ऐतिहासिक माहिती मिळवतो
10चित्रकलेत विशेष प्रगती
11दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
12गणितातील क्रिया अचूक करतो
13शिक्षकाविषयी आदर बाळगतो
14शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
16प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
17खेळ उत्तम प्रकारे खेळते
18विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22चित्रे छान काढतो व रंगवतो
23उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
24प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
25दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
26स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
27शाळेत नियमित उपस्थित राहतो 
28वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
32वाचन स्पष्ट व अचूक करतो
33चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
34नियमित शुद्धलेखन करते
35शालेय उपक्रमात सहभाग घेते
36स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
37कार्यानुभवातील वस्तू बनवितो
38तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
39गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
40प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
41सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42हिंदीतून पत्र लिहितो
43परिपाठात सहभाग घेते
44इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
45क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
46मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
47प्रयोगाची कृती अचूक करते
48आकृत्या सुबक काढते
49वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
50वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
51शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
52सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
53व्यवहार ज्ञान चांगले आहे
54अभ्यासात सातत्य आहे
55वर्गात क्रियाशील असते
56अभ्यासात नियमितता आहे
57वर्गात लक्ष देवून ऐकतो
58 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
59गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
60अभ्यासात सातत्य आहे
61अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63वर्गात नियमित हजर असतो 
64स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
65खेळण्यात विशेष प्रगती
66Activity मध्ये सहभाग घेतो
67सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
68विविध प्रकारची चित्रे काढते
69 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
आवड छंद
1चित्रे काढतो
2गोष्ट सांगतो
3गाणी -कविता म्हणतो
4नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5खेळात सहभागी होतो
6अवांतर वाचन करणे
7गणिती आकडेमोड करतो
8कार्यानुभवातील वस्तु बनवितो
9स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10कथा,कविता,संवाद लेखन करतो
11वाचन करणे
12लेखन करणे
13खेळणे
14पोहणे
15सायकल खेळणे
16चित्रे काढणे
17गीत गायन
18संग्रह करणे
19उपक्रम तयार करणे
20प्रतिकृती बनवणे
21प्रयोग करणे
22कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23खो खो खेळणे
24क्रिकेट खेळणे
25 संगणक हाताळणे
26गोष्टी ऐकणे
27गोष्टी वाचणे
28वाचन करणे
29रांगोळीकाढणे
30प्रवास करणे
31नक्षिकाम
32व्यायाम करणे
33संगणक
34नृत्य
35 संगीत ऐकणे
सुधारणा आवश्यक 
1वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2अभ्यासात सातत्य असावे
3अवांतर वाचन करावे
4शब्दांचे पाठांतर करावे
5शब्दसंग्रह करावा
6बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7नियमित शुद्धलेखन लिहावे
8गुणाकारात मांडणी योग्य करावी
9खेळात सहभागी व्हावे
10संवाद कौशल्य वाढवावे
11परिपाठात सहभाग घ्यावा
12विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13हिंदी भाषेचा उपयोग करावे
14शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15गटचर्चेत सहभाग घ्यावा
16चित्रकलेचा छंद जोपासावा
17वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18संगणकाचा वापर करावा
19प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21गटकार्यात सहभाग वाढवावे
22गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23हस्ताक्षरात सुधारणा करावी
24विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31शालेय परिपाठात सहभाग असावा
32उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33लेखनातील चुका टाळाव्या
34नकाशा वाचनाचा सराव करावा
35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36नियमित अभ्यासाची सवय लावावी
37नियमित उपस्थित राहावे
38जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39वाचन व लेखनात सुधारणा करावी
40अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42अक्षर सुधारणे आवश्यक
43भाषा विषयात प्रगती करावी
44अक्षर वळणदार काढावे
45गणित सूत्राचे पाठांतर करावे
46स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48गणिती क्रियाचा सराव करा
49संवाद कौशल्य आत्मसात करावे
50गणितातील मांडणी योग्य करावे
51शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
52इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
व्यक्तिमत्व गुणविशेष 
1आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2आपली मते ठामपणे मांडतो
3कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5आत्मविश्वासाने काम करतो
6इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11धाडसी वृत्ती दिसून येते
12स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
16मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18शाळेच्या नियमाचे पालन करतो
19इतराशी नम्रपणे वागतो
20नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
21नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
22उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23शाळेत येण्यात आनंद वाटतो
24गृहपाठ आवडीने करतो
25खूप प्रश्न विचारतो
26स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
27शिक्षकाविषयी आदर बाळगतो

नवोपक्रम

ई-बुक

ई-साठी येथे क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx